शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळावे – ओमकार पवार (भा. प्र. से.) मुख्य कार्यकारी अधिकारी

पाहुचीबारी (ता. पेठ) येथे तुती लागवड व रेशीम उद्योग कार्यशाळा संपन्न
शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळावे – ओमकार पवार (भा. प्र. से.) मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद कृषी विभाग व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तुती लागवड व रेशीम उद्योगावरील विविध योजनांची कार्यशाळा पाहुचीबारी येथील रेशीम शेतकरी हिरामण एकनाथ मोरे यांच्या शेतावर आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला मा. ओमकार पवार (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, अर्जुन गुंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी, जे. टी. सूर्यवंशी गटविकास अधिकारी, सुनील बागुल सहाय्यक गटविकास अधिकारी, विजय धांनक कृषी अधिकारी तथा नोडल अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार म्हणाले, “पेठ तालुक्यातील रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी तब्बल ५० टक्के शेतकरी या तालुक्यातील आहेत. भात, नागली व इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक उत्पन्न देणारा हा उद्योग असून तालुक्यात किमान ५०० शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळावे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे व कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी रेशीम उद्योगाच्या तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला सुमारे ६५० शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच सरपंच, रोजगार सेवक, मा. शिरसाट (उपअभियंता), कांबळे (उपअभियंता), वाकडे (बालविकास अधिकारी), मिलिंद भोये, विकास गारे (कनिष्ठ अभियंता), दुर्गादास बोसारे, शाम गवळी, एम. के. चौधरी, सुधाकर भुसारे, देविदास चौधरी, मोहन कामडी, ज्ञानेश्वर जाधव, यशवंत गवांडे, रविंद्र मोरे, कृष्णा चौधरी, धर्मराज देशमुख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचे आयोजन जयवंत गारे (विस्तार अधिकारी), संतोष राठोड, सचिन जाधव (विस्तार अधिकारी) यांनी केले. आभार ओमकार जाधव यांनी मानले.



