सांबरखल येथे कृषी विभाग व लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

सांबरखल येथे कृषी विभाग व लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी
सांबरखल येथे कृषी विभाग, लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
मंडळ कृषी अधिकारी, बाऱ्हे एस. एस. मोरे, उप कृषी अधिकारी एस. पी. बहिरम, तसेच पिकेमाळी मंडळातील सहाय्यक कृषी अधिकारी हिरामण गायकवाड, रामदास पाडवी, दिलीप चौरे, पंडित चौधरी, कोमल गावित, सुभाष पालवी, चंद्रकांत गावित, वाय. पी. धामोडे, मनोज बागुल, आनंदा गावंडे, सुरेश वाघ यांनी बंधारा उभारणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
सांबरखल गावातील शेतकरी बांधवांनीही मोठ्या उत्साहाने श्रमदान करत बंधारा उभारण्यात मोलाची भूमिका बजावली.
या महत्त्वपूर्ण जलसंधारण उपक्रमामुळे परिसरातील जलसाठा वाढीस लागणार असून शेतकऱ्यांना भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे.


