आपला जिल्हा
ब्रेकिंग न्यूज, सप्तशृंगी गडहून परतताना भीषण अपघात कार 1,000 फूट दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

- ब्रेकिंग न्यूज, सप्तशृंगी गडहून परतताना भीषण अपघात
कार 1,000 फूट दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू
कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड दर्शन करून घराकडे परतत असताना झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज उघड झाली.
प्राथमिक माहितीनुसार, परतीच्या प्रवासात एका तीव्र वळणावर कारचालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट अंदाजे जवळपास 1,000 फूट खोल दरीत कोसळले. धडक इतकी जबरदस्त होती की कारमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. दरीत पडलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी पथकाला मोठा संघर्ष करावा लागला.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सप्तशृंगी गड मार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.



