आपला जिल्हासंपादकीय
बिवळ येथे श्रमदानातून नार नदीवर वनराई बंधाऱ्याची उभारणी
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

बिवळ येथे श्रमदानातून नार नदीवर वनराई बंधाऱ्याची उभारणी
मौजे बिवळ येथे ग्रामस्थांच्या एकत्रित श्रमदानातून नार नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. ग्रामीण भागातील जलसंधारणाची गरज लक्षात घेऊन ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत हा बंधारा पूर्ण केला.
या उपक्रमात उपसरपंच भागवत दादा ठाकरे यांच्या मार्गदर्शनासह परशराम थोरात, विठ्ठल भोये, पंडित कामडी, जिवला थोरात, हेमराज गावंडे, एकनाथ चौधरी तसेच वाघधोंडचे सहाय्यक कृषी अधिकारी एन. एम. भोये यांची उपस्थिती होती.श्रमदानातून उभारलेल्या या बंधाऱ्यामुळे परिसरातील जलसाठा वाढून शेतीला मोठा लाभ होणार असून ग्रामस्थांनी ही कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे.



