क्राईम स्टोरी
सुरगाणा येथे एसीबीची कारवाई : सुरगाणा पोलिस ठाण्याचे एएसआय ७ हजारांची लाच घेताना रंगेहात

सुरगाणा येथे एसीबीची कारवाई : सुरगाणा पोलिस ठाण्याचे एएसआय ७ हजारांची लाच घेताना रंगेहात
बेपत्ता मुलीचा शोध लावल्याबदल्यात १५ हजारांची लाच मागणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चौधरी (वय ५६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ हजार रुपये स्वीकारताना आज दुपारी रंगेहात पकडले.
तक्रारदाराच्या मुलीची मिसिंग तक्रार नोंदवल्यानंतर चौधरी यांनी बक्षीस म्हणून लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे झाली. पडताळणीत आरोपीने मागणी कायम ठेवून तडजोडीने ७ हजारांची मागणी केली.
हॉटेल कर्मवीर, सुरगाणा येथे सापळा रचून आरोपीने ७ हजार रुपये स्वीकारताच एसीबीने त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत रक्कम व ओपो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. घरझडती सुरू आहे.
या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गु.र.न. २७२/२०२५, कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली.


