भोरमाळ संकुलात कौशल्यविकासाचा १८० युवक–महिलांना प्रमाणपत्र वाटप; तहसीलदार राठोड यांच्या हस्ते वितरण.

भोरमाळ संकुलात कौशल्यविकासाचा
१८० युवक–महिलांना प्रमाणपत्र वाटप; तहसीलदार राठोड यांच्या हस्ते वितरण.
संसदीय संकुल विकास परियोजना अंतर्गत भोरमाळ संकुलात आयोजित NSDC जनजाति कौशल्य विकास प्रकल्पाचा प्रमाणपत्र वाटप सोहळा उत्साहात पार पडला. सेवावर्धिनी, पुणे यांच्या माध्यमातून सुरगाणा तालुक्यातील तब्बल १८० युवक व महिलांना विविध कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात आले असून, स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला आहे.
कार्यक्रमाला मा. तहसीलदार राठोड साहेब प्रमुख उपस्थित होते. प्रमाणपत्र वाटप करताना त्यांनी प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन केले.
प्रशिक्षणात तांदूळ प्रक्रिया, पशुपालन, शिलाई मशीन, सोलर पीव्ही इंस्टॉलेशन, टू-व्हीलर दुरुस्ती या पाच महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होता. सर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला प्रतिष्ठित पाहुण्यांची उपस्थिती लाभली—
- श्री. गिरीश देगांवकर – कार्यकारी अधिकारी, सेवावर्धिनी
- श्री. विनायक गावित – आ. आघाडी जिल्हा अध्यक्ष
- श्री. विठ्ठल गावित – मंडल अध्यक्ष
- श्री. ललित चव्हाण – IMC मेंबर, ITI सुरगाणा
- दिपक आव्हाड – प्रकल्प अधिकारी, सेवावर्धिनी
- मिळाले साहेब – कृषी सह अधिकारी, कृषी विभाग
- विठ्ठल पवार – कौशल्य मित्र, NSDC
- हर्षवर्धन गावित – युवा कार्यकर्ते
- प्रेमराज पवार – अनुलोम
भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांनी ग्रामीण भागातील युवक–महिलांना कौशल्य प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व भविष्यासाठी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षक
- योगेश चौधरी – तांदूळ प्रक्रिया
- आरती चोथवा – शिलाई मशीन
- अशोक भोये – टू–व्हीलर दुरुस्ती
सुत्रसंचालन व व्यवस्था
सुत्रसंचालन मधुकर चोथवा (प्रकल्प समन्वयक, सेवावर्धिनी) यांनी तर कार्यक्रमाची उत्कृष्ट व्यवस्था गणेश पवार व पुष्पराज गावित (ग्रामस्तरीय सहाय्यक) यांनी सांभाळली.
प्रशिक्षण, रोजगार आणि संधी—या तिन्हींचा संगम घडवणारा हा उपक्रम सुरगाणातील युवक–महिलांसाठी आशेचा नवा किरण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



