बाऱ्हे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात संपन्न*

*बाऱ्हे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात संपन्न*
सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथील डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच डॉ.विजय बिडकर इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवित, विद्यार्थिनींनी डोक्यावर कलश धारण करून लेझीम पथकाने सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ईश्वर स्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर ज्ञानाची देवता सरस्वती माता,स्वामी विवेकानंद,आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा, कर्मवीर दादासाहेब बिडकर,डॉ.विजय बीडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा हेमलता ताई बिडकर, प्रमुख पाहुणे सहा.पोली.निरी. प्रदीप गीते यांचे भाषण झाले. यात विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवण्या बरोबरच शिक्षण घेऊन अभ्यासातही प्रगती करावी व आपण ज्ञानी व्हावे तसेच मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ झाल्याशिवाय कोणीही लग्न करू नये असा संदेश दिला. तसेच भारतीय दंड संहिता कायद्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेले कायदे, महिला सुरक्षा विषयक कायदे,पॉक्सो कायदा, बाल विवाह, वाढती व्यसनाधीनता, वाहतूक सुरक्षा विषयक नवीन नियम व कायदे तसेच मोबाईलच्या अती वापरामुळे होणारे दुष्परिणाम, सायबर गुन्हेगारी याविषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यात डॉ.विजय बिडकर इंग्लिश मिडीयम स्कूलचे बाल कलाकार यांच्यासह इयत्ता ५वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेसह विविध प्रकारचे वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य, आदिवासी नृत्य, डांगी नृत्य, इयत्ता ११वी व १२वीतील विद्यार्थीनींनी पाणी संकटावर मात करण्यासाठी जनजागृती चालीरीती आधारित किर्तन रूपी नाटक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बाऱ्हे कला नगरीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळ नाशिक विद्यमान अध्यक्षा हेमलता ताई बिडकर ह्या होत्या. प्रमुख पाहुणे जेष्ठ संचालक अरविंद देशपांडे, श्रीकृष्ण चंद्रात्रे, बाऱ्हे पोलीस ठाणे सहा.पोली.निरी. प्रदीप गीते, लोकनियुक्त सरपंच वैशालीताई गावीत, उपसरपंच छबीताई वार्डे, सरपंच राजेंद्र निकुळे, माजी सरपंच परशराम वार्डे, माजी उपसरपंच त्र्यंबक ठेपणे, उपसरपंच नामदेव पाडवी, सदस्य देविदास गावित, दत्तात्रय पवार, सामाजिक कार्यकर्ता मनोज देशमुख, मनोहर जाधव, बाळा पवार, रवी जाधव, बाऱ्हे परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह बाऱ्हे परिसरातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलिस पाटील आदी उपस्थित होते. प्राचार्य मधुकर मोरे यांनी प्रस्ताविक करून उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक नितीन अहिरे, उपशिक्षिका श्रीम.हिरा खांबाईत यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर, कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
फोटो – बाऱ्हे विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात नृत्य करताना बाल कलाकार आदी.



