सुरगाणा महाविद्यालयात वीर बाल दिवस साजरा

सुरगाणा महाविद्यालयात वीर बाल दिवस साजरा
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित सुरगाणा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या तंत्र शिक्षण विभागांतर्गत २६ डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. दीपक जोंधळे यांनी वीर बाल दिवसामागील पार्श्वभूमी सांगितली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विजय अहिरे होते. त्यांनी साहित्य, क्रीडा किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय नावलौकिक प्राप्त करणाऱ्या बालकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्याचा गुणगौरव करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, असे सांगितले.
प्रास्ताविक प्रा. केशव गावित यांनी केले. आभार रोशन पवार यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. बी. डी. धूम, प्रा. भगवान महाले, डॉ. अनिल गायकवाड, प्रा. कृष्णा गांगोडे, प्रा. सुभाष कामडी, प्रा. भागीनाथ टोपले, नाना कोर, ओमकार धूम उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
—



