अभोणा वस्तीगृहाच्या मुलींचा कळवण प्रकल्पावर पायी मोर्चा; विविध मागण्यांसाठी आंदोलन
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

अभोणा वस्तीगृहाच्या मुलींचा कळवण प्रकल्पावर पायी मोर्चा; विविध मागण्यांसाठी आंदोलन
अभोणा (ता. कळवण) येथील शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थिनींनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कळवण प्रकल्प कार्यालयावर आज पायी मोर्चा काढत लक्षवेधी आंदोलन केले. वस्तीगृहातील मूलभूत सुविधा तसेच सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. “आम्हाला आमचे हक्क द्या”, “वस्तीगृहातील सुविधा त्वरित सुधाराव्यात” अशा घोषणा देत मुलींनी आपली भूमिका ठामपणे मांडली. वस्तीगृहात सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप विद्यार्थिनींनी यावेळी केला.
यावेळी कळवण प्रकल्प अधिकारी कश्मिरा संखे यांची मुलीनी भेट घेऊन आपल्या मागण्यां सांगितल्या व अडचणी बाबतीत चर्चा करण्यात आली. मागण्यांची दखल घेत तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन कळवण प्रकल्प अधिकारी कश्मिरा संखे यांनी दिले आहे.
विद्यार्थिनींच्या या शांततापूर्ण आंदोलनामुळे वस्तीगृहातील समस्यांकडे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, लवकरच ठोस निर्णय अपेक्षित असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



