ब्रेकिंग न्यूज | नाशिक–पेठ रस्त्यावर भीषण अपघात दोन कारच्या समोरासमोर धडकेत महिलेेसह चार ठार, आठ जखमी; चार महिलांची प्रकृती गंभीर

ब्रेकिंग न्यूज | नाशिक–पेठ रस्त्यावर भीषण अपघात
दोन कारच्या समोरासमोर धडकेत महिलेेसह चार ठार, आठ जखमी; चार महिलांची प्रकृती गंभीर
शिर्डीहून गुजरातकडे जात असताना नाशिक–पेठ रस्त्यावरील चाचडगाव टोलनाक्यापुढे आंबेगण शिवारात बुधवारी (दि.७) दुपारी ३ वाजता दोन कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार महिला गंभीर असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नाशिककडून पेठकडे जाणारी स्कॉर्पिओ (GJ 15 CR 7964) ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या कारला (DD 01 AA 9013) जोरदार धडक बसली. धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
अपघातात छोगालाल हिरालाल गुर्जर (७५, रा. देवगड, राजस्थान) व शाहरुख खान फराकत (२८, रा. सिल्वासा) यांच्यासह अन्य एक महिला व एक प्रवासी ठार झाले. मृतांपैकी काही जण राजस्थान व गुजरातमधील असल्याची माहिती आहे.
अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिस व नागरिकांच्या मदतीने वाहनांचे पत्रे कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



