कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ : पाच आकडी वेतन तरीही लाचखोरी!
हरसूलला आरएफओ–वनपाल अटकेतून वनविभागात जोरदार चर्चा
लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)
हरसूल येथे ५० हजार रुपयांची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास सोनवणे आणि वनपाल सुनील टोंगारे अटकेत आल्याने संपूर्ण वनविभागात जोरदार चर्चा रंगली आहे. प्रति महिना ९० हजार व ७० हजार रुपये वेतन असूनही लाचखोरी का थांबत नाही, असा सवाल स्वतः वनविभागातील अधिकारी–कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
ग्रामीण भागात कारवाईच्या नावाखाली अर्थपूर्ण संबंध ठेवले जात असल्याच्या चर्चांना या कारवाईमुळे पुन्हा उधाण आले आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.