विशेष वृतान्त
शिंदे दिगर शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

शिंदे दिगर शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
सुरगाणा पोलीस ठाणे अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ०१/२०२६ प्रमाणे आज दि. ०४/०१/२०२६ रोजी एका अज्ञात बेवारस इसमाचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. सदर इसम हा सुरगाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदे दिगर शिवारात मयत अवस्थेत मिळून आला आहे.
या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. तरी सुरगाणा व परिसरातील नागरिकांनी आपापल्या हद्दीत या इसमाचे नातेवाईक किंवा ओळखीचे व्यक्ती मिळून आल्यास सुरगाणा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर, सुरगाणा पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा.


