# आशादायी बातमी, सुरगाणा तालुक्यात १७६१ सौर कृषी पंप कार्यान्वित – आवाज जनतेचा
कृषी

आशादायी बातमी, सुरगाणा तालुक्यात १७६१ सौर कृषी पंप कार्यान्वित

वीज टंचाईच्या काळातही घेता येणार नगदी पिके

सुरगाणा तालुक्यात १७६१ सौर कृषी पंप कार्यान्वित

वीज टंचाईच्या काळातही घेता येणार नगदी पिके

लक्ष्मण बागुल | बोरगाव (९८२३७७९२०२)

सुरगाणा तालुक्यामध्ये विजेच्या प्रश्नाने गेल्या अनेक वर्षापासून गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. मुळातच या तालुक्यात व्यावसायिक शेती कमी प्रमाणात असल्यामुळे विजेचा खप त्यामानाने कमी होतो. मात्र, लोकांनी घरगुती वीज मिळवण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केल्याने वीज मंडळाची पाहिजे तशी वसुली होत नाही. यामुळे तालुक्यात जर वीज पुरवठ्यात काही व्यत्यय आला तर वीज मंडळाचे कर्मचारी तो अडचण दुरुस्त करण्यामध्ये टाळाटाळ करण्याचे प्रकार घडतात. आहेत. यावर उपाय म्हणून नागरिकांचा आता सोलर एनर्जीकडे ओढा वाढलेला दिसतो. फक्त सुरगाणा तालुक्याचा विचार जरी केला तरी महाऊर्जा या शासनाचा उपक्रमावर माध्यमातून १२११ शेतकऱ्यांनी सोलर वीज पंप बसवलेले आहेत. यासह महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या माध्यमातूनही ५५० सोलर विज पंप असे एकूण १७६१ सौर कृषीपंप बसवण्यात आले.

आदिवासी शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदान

आदिवासी शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप घेण्यासाठी फक्त टक्के रक्कम भरावी लागते. यासाठी ३ अश्‍वशक्तीचा पंप घेण्यासाठी ११५०० रुपये, ५ अश्वशक्तीचा कृषी पंप घेण्यासाठी १६०३८ रुपये, साडेसात अश्‍वशक्तीचा कृषी पंप घेण्यासाठी २२५०० रुपये भरावे लागतात. उर्वरित ९५ टक्के रक्कम ही अनुदान रुपात शेतकऱ्यांना मिळत असल्याने मोठा फायदा होतो. शिवाय राज्य वीज वितरण कंपनीच्या पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणीपासूनही सुटका होते. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा ओढा सोलर कृषी पंपाकडे वाढल्याचे दिसत आहे.

सौर कृषीपंपात येवला आघाडीवर
सरकारच्या महाऊर्जा या उपक्रमामार्फत नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत ११२६५ सौर कृषी पंप बसवून देण्यात आले आहे. त्यात सर्वात जास्त फायदा येवला तालुक्याने घेतलेला आहे. त्या खालोखाल चांदवड व सुरगाणा तालुक्याचा क्रमांक लागतो.

तालुकावार सौर कृषीपंप

येवला – ३३९६, चांदवड – १३६२, सुरगाणा – १२११, नांदगाव – १२०५, मालेगाव – १०६६, पेठ – ९०७, दिंडोरी- ६१४, सिन्नर – ४९१, कळवण – ३८८, निफाड – २२६, त्र्यंबकेश्वर – १९६, देवळा – १०३, सटाणा – ६०, इगतपुरी – २८, नाशिक – १२

वांगणसुळेत शंभरावर कृषी पंप

बाफळून, म्हैसखडक, भवाडा, करंजूल, राक्षसभुवन, वांगण सुळे, गोंडाळविहीर, रगतविहीर या गावांमध्ये सोलर कृषीपंप बसवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

आता नगदी पिके घेणार

मी डिसेंबर महिन्यात निफाड दिंडोरीमध्ये द्राक्षबागेच्या कामावर गेलो होतो.
डोंगराच्या कडेला ३६ एकर जमीन आहे. विहीर खोदली असता १० फुटावरच पाणी लागले. महाऊर्जाच्या सहकार्यातून सौर पंप बसविल्याने मला आता नगदी पिके घेता येणार असल्याने आनंद वाटतो

हिरामण गायकवाड वांगण सुळे, ता. सुरगाणा

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!