पत्रकार दिनानिमित्त आयोजित दर्पण रत्न पुरस्कार नामदेव पाडवी यांना प्रदान

पत्रकार दिनानिमित्त आयोजित दर्पण रत्न पुरस्कार नामदेव पाडवी यांना प्रदान
मराठी पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघा च्या वतीने आयोजित *दर्पण रत्न पुरस्कार 2026* कार्यक्रम मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला. यामध्ये नामदेव पाडवी यांना प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला .आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित हिंदी मराठी पत्रकार संघ च्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दर्पण रत्न पुरस्कार 2026 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते
त्यावेळी 980 प्रस्तावांपैकी निवड करून 240 मान्यवरांना दर्पण रत्न पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. दर्पण रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश तायडे सहा. माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई कार्यक्रमाचे उद्घाटक
डॉ. प्रा. अनिल खर्चे (प्राचार्य व्ही. बी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज) , तर प्रमुख पाहुणे अशांत भाई वानखेडे संस्थापक समतेचे निळे वादळ , धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, बंडूभाऊ चवरे उद्योजक, बाळासाहेब दामोदर उद्योजक , दामोदर शर्मा शेतकरी नेते, विजय डागा, बंडू चौधरी, सुभेदार दिनेश तायडे कारगिल योद्धा, चंद्रकांत वर्मा, हे होतेकार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक ,राजकीय ,कला, वैद्यकीय, उद्योजक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार दर्पण रत्न पुरस्कार 2026 देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी देशासाठी आपल्या प्राणाची परवा न करता देशसेवा करणाऱ्या तसेच कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुभेदार दिनेश तायडे माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय टप, सतीश दांडगे, प्रा. प्रकाश थाटे, सुधाकर तायडे, प्रमोद हिवराळे, मयूर लड्डा, , शेख ताहेर , विनायक तळेकर, भाऊराव व्यवहारे , सुनील देशमुख, अमोल वानखेडे, किशोर सोनवणे, विनोद व्यवहारे, श्रीकृष्ण शिरसागर, बिस्मिल्ला पठाण,यांनी परिश्रम घेतले



