ग्रामीण रुग्णालय सुरगाणा मार्फत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

ग्रामीण रुग्णालय सुरगाणा मार्फत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर
लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सिव्हिल हॉस्पिटल नाशिक आणि ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष समसंस्कार शिबिर प्रतापगड येथे आयोजित केले आहे या शिबिरात आज दिनांक 8/01/2026 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर व ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांन मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता .सदर रक्तदान शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . संजय चौधरी, डॉ.राजेश दुसाने व टिम डॉ. हर्षवर्धन मोरे डॉ. माधुरी आहेर डॉ. दिपक चौधरी, श्री.राकेश मिश्रा, श्री. राकेश महाले ,श्री बळीराम ढेपाळे ,श्री अक्षय सोनवणे व टिम राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.भगवान महाले, प्रा.कविता भोये , प्रा. देवचंद कवर, प्रा. बाळू धुम, प्रा.शंकर भगरे श्री. हेमंत चौधरी श्री. ओमकार धूम ग्रामीण रुग्णालय सुरगाणा टीम , सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढीतील डॉ. दुसाने व टीम, स्वदेश फाउंडेशन व टीम यांनी विशेष परिश्रम घेतले . गावकरी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने शिबिरास उपस्थित होते. सदर शिबीरात नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी करण्यात आली व रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच रेड रिबन क्लब, सुरगाणा व स्वयंसेवक यांनी गावात एड्स जनजागृती केली. गावकरी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने शिबिरास उपस्थित होते. सदर शिबीरात नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी करण्यात आली व रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच रेड रिबन क्लब, सुरगाणा व स्वयंसेवक यांनी गावात एड्स जनजागृती केली.


