आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. अशोक बागुल

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. अशोक बागुल
बोरगाव । लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)
आदिवासी एकता परिषदेतर्फे ३३ वे आदिवासी सांस्कृतिक एकता राष्ट्रीय महासंमेलन १३, १४ व १५ जानेवारीस चैनपुरा (ता. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर) येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे प्रा. अशोक बागुल यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा मान पहिल्यांदाच नाशिकला मिळाला आहे.
आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे अस्तित्व, एकता, अस्मिता, सांस्कृतिक वारसा, कला, भाषा, इतिहास तसेच निसर्गाशी असलेले अतूट नाते यांचे संवर्धन व संरक्षण करणे, मानवी मूल्यांचे रक्षण, मानवमुक्ती व प्रकृतिमुक्ती याबाबत विचारमंथ होणार आहे. गेल्या ३३ वर्षांपासून हे महासंमेलन सातत्याने आयोजित केले जात आहे. यावर्षीच्या महासंमेलनाची मुख्य थीम ‘उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाचा मानव व प्रकृतिवर होणारा दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय’ अशी आहे. याबाबत विविध सत्रांमधून सखोल चर्चा, मंथन व मार्गदर्शन होणार आहे. आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. अशोक बागुल यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातून महासंमेलनाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी मागील एक महिन्यापासून सखोल चर्चा व बैठका झाल्या. त्यात १३ डिसेंबरला पानखेडा (पिंपळनेर, धुळे), २१ डिसेंबरला आडगाव (शहादा, जि. नंदुरबार), २८ डिसेंबरला चैनपुरा (नेपानगर, म. प्रदेश) तसेच ६ डिसेंबरला नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत अध्यक्षीय मंडळ सदस्य राजूकाका पांढरा, महासचिव डोंगरभाऊ बागुल, कीर्ती वरठा व राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या बैठकीस सरोज भोये, अशोक ठाकरे, अश्विनी ठाकरे, डॉ. सुनील पऱ्हाड, दत्ता करबट, किसन ठाकरे, अॅड. दत्तू पाडवी, जयवंत गारे, अॅड. जगन्नाथ वरठा, रावण चौरे, सुभाष गवळी, कांचन काटकर, के. के. गांगुर्डे, तुकाराम बहिरम, आनंदराव भोये, विजय पवार, मांगीलाल गांगुर्डे, ईश्वर ठाकरे, चिंतामण गायकवाड, महारू देशमुख, गुलाब भोये, मोहन ठाकरे , विनोद मोरे, सुरेश मालचे, व्हीपीसिंग भोये, करण गायकवाड, नीलेश वरठा उपस्थित होते.


