शिष्यवृत्ती कार्यशाळा उत्साहात पार पडली

शिष्यवृत्ती कार्यशाळा उत्साहात पार पडली
लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गोर-गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केंद्र शासनाच्या विविध शिष्यवृत्तींची माहिती व्हावी, या उद्देशाने शिष्यवृत्ती जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाली.
कार्यशाळेत प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर यांनी विविध शिष्यवृत्ती योजना, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन आवेदन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व त्या सोडविण्याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तींचा योग्य लाभ घेऊन उच्च शिक्षण पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विजय अहिरे, कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र शिंदे, मिलिंद पवार, रोशन पवार, हेमंत चौधरी, ओमकार धुम यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



