

#

सुरगाणा तालुक्यातील हतगड गणातून पंचायत समिती सदस्य पदासाठी हतगड येथील काळू उत्तम बागुल हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना बागुल यांनी सांगितले की, “ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य आणि तरुणांच्या रोजगाराच्या संधींवर भर देत जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार आहे.”हतगड परिसरात या घोषणेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकीत रंगत वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.