सुरगाणा तालुक्यातील दांडीचीबारी घाटातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास एक बस अपघातग्रस्त झाली. रस्त्यावरील मोठे खड्डे चुकवित असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
या दुर्घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणत ही जिवितहानी झाली नाही.
दरम्यान, दांडीचीबारी घाटातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रवासी व ग्रामस्थांकडून अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.