मोखाडा तालुक्यातील ६४५० विद्यार्थ्यांना थंडीची उब – प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट नवी मुंबईचा सामाजिक उपक्रम

मोखाडा तालुक्यातील ६४५० विद्यार्थ्यांना थंडीची उब – प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट नवी मुंबईचा सामाजिक उपक्रम
मोखाडा तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे, या उदात्त हेतूने प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट, नवी मुंबई यांच्या वतीने “थंडीची उब” या सामाजिक उपक्रमांतर्गत मोखाडा तालुक्यातील १०३ जिल्हा परिषद शाळांमधील एकूण ६४५० विद्यार्थ्यांना गरम स्वेटरचे वाटप करण्यात आले.
थंडीच्या दिवसांत विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे व त्यांचा शालेय उपस्थितीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक व शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमासाठी प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट, नवी मुंबई चे अध्यक्ष, समन्वयक तसेच सर्व पदाधिकारी व सहकार्यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणप्रवाहाला निश्चितच बळ मिळाले आहे.
हा उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



