आपला जिल्हा
पिळकोस येथे निमगोळे डोंगराच्या पायथ्याशी नर बिबट्या मृत; भूकबळीमुळे मृत्यू

पिळकोस येथे निमगोळे डोंगराच्या पायथ्याशी नर बिबट्या मृत; भूकबळीमुळे मृत्यू
कळवण तालुक्यातील पिळकोस येथील निमगोळे डोंगराच्या पायथ्याशी काठेवाडी वस्ती नजीक आज सकाळी सहा वाजता दीड ते दोन वर्षे वयाचा नर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच देवळा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व शवविच्छेदनानंतर सदर बिबट्याचा मृत्यू भूकबळीमुळे झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



