# गुजरात सीमेवरील रगतविहीर येथे पेंढारदेव यात्रा – आवाज जनतेचा
धार्मिक व आध्यात्मिक

गुजरात सीमेवरील रगतविहीर येथे पेंढारदेव यात्रा

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेले रगतविहीर गावातील पिलवा डोंगरावर पेंढारदेव नावाचे देवस्थान असून या ठिकाणी रगतविहीर (महाराष्ट्र) चोरवणी, निरपण ( गुजरात ) या तीन गावांच्या सीमेवर हे देवस्थान आहे. शेकडो वर्षांपासून या ठिकाणी या परिसरातील भाविक येऊन पूजा करतात. दिवाळीनंतर कार्तिकी पौर्णिमेला या ठिकाणी रात्रीची यात्रा भरते. यावेळी हजारो भाविक दर्शनाला येत असतात. परंतु यावर्षी या डोंगरावर जाण्याची रस्त्याची सोय नसल्याने ही यात्रा यावर्षी कमी प्रमाणात झाली. पावसाने रस्ता वाहून गेला आहे. पुढच्या वर्षांपासून ही यात्रा दरवर्षी घेण्यात येणार आहे. यात्रा जरी नसली तरी हजारो भाविक हा डोंगर सर करत दर्शनाला येत आहेत.
या देवाची पूजा करण्याचा मान रगतविहीरमधील भगत यांना असतो. या ठिकाणी नैसर्गिकरित्या तयार झालेले कुंड असून त्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. पूर्वीपासून या ठिकाणी उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध राहायचे त्यामुळे येथील गायी गुरे आपली तहान भागवत असत. वनकुवा नावाची एक जागा असून पूर्वी यात बसून भाविक भजन म्हणायचे. पेंढारदेव अशा ठिकाणी स्थित आहे की एका बाजूलाहुन उतरून तिथपर्यंत अवघड जागेतून जायला जागा आहे व खालच्या बाजूला खूप मोठा कडा आहे. पूर्वी या देवाची पूजा करणारे भगत ( पुजारी ) आणि पेंढारदेवावर श्रद्धा असणारे लोक या देवाला धरून फेरा मारत असत. असा समज होता की जो खरा भक्त असेल तोच या देवाला फेरा मारू शकत होता.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!