सुरगाणा तालुक्यातील राशा ग्रामपंचायतीत ‘एक पेड माझ्या नावाने’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची तयारी जोरदार सुरू आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मधुकर वाघेरे व सरपंच सिताराम भोये यांनी पुढाकार घेत आहे.
या उपक्रमाद्वारे प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या नावाने एक तरी झाड लावावे आणि त्याची नियमित निगा राखावी, असा संदेश देण्यात येत आहे. या माध्यमातून गावात हरित वातावरण निर्मिती होण्यासोबतच नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण होणार आहे.
ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने हाती घेतलेली ही मोहीम ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनासाठी एक प्रेरणादायी आणि आदर्श ठरणारी ठरणार आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.