प्रथम इन्फोटेक फाऊंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या आणि LTI Mindtree Foundation यांच्या सहकार्याने चालणाऱ्या IVDP कार्यक्रमांतर्गत सुरगाणा तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जूट बॅगचे वितरण करण्यात आले.

प्रथम इन्फोटेक फाऊंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या आणि LTI Mindtree Foundation यांच्या सहकार्याने चालणाऱ्या IVDP कार्यक्रमांतर्गत दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सुरगाणा तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जूट बॅगचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा बोरगाव, चिखली, खरूडे, मालगव्हाण, टेटपाडा, टोपलपाडा, झगडपाडा, वांगण सु, खोकरविहीर, आणि भवाडा येथील विद्यार्थ्यांना एकूण 600 जूट बॅग तसेच चॉकलेट देण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक पातळीवर मागे पडणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या ब्रिज क्लास उपस्थितीत वाढ व्हावी आणि नियमित शालेय हजेरीत सुधारणा व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
लहानसे गिफ्ट मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. LTI Mindtree कडून मिळालेल्या या छोट्याशा प्रोत्साहनामुळे विद्यार्थी खुश आणि उत्साहित दिसले.



