सुरगाणा तालुक्यातील कनाशी वनपरीक्षेत्र अंतर्गत हतगड परिमंडळ परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून रात्रीच्या वेळेत मानवी वस्ती मध्ये व गावालगतच्या हॉटेल परिसरात बिबट्या दिसून आला आहे. या बिबट्याचा वावर वाढला असुन
गावातील अनेक कुत्रे, व कोंबड्या याने भक्षण केले आहे. त्याच बरोबर पाळीव प्राणी व मानवी सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमंध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या पुढे काही मानवी जीवित हानी होऊ नये. यासाठी बिबट्याला त्वरित जेरबंद करण्यासाठी कनाशी वनपरी-क्षेत्र, व वनपरीमंडळ वनविभागाचे अधिकारी यांनी पिंजरा लावावे. अशी नागरिकांची व ग्रामपंचायत हतगड सरपंच देविदास दळवी यांनी दि. १०/११/२०२५ रोजी वनविभागाला पत्र देऊन मागणी केली आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.