सुरगाणा तालुक्यातील हडकाईचोंड गावाला वेल्स ऑन व्हील्स संस्थेकडून ४५ जलचक्रीचे वाटप
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाणा तालुक्यातील हडकाईचोंड गावाला वेल्स ऑन व्हील्स संस्थेकडून ४५ जलचक्रीचे वाटप
दिनांक २३-११-२०२५ रोजी सुरगाणा तालुक्यातील पाणी टंचाई गाव हडकाईचोंड येथे Wells on Wheels संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष श्री. शहाज मेनन यांच्या संकल्पनेतून ४५ जलचक्रीचे मोफत वाटप करण्यात आले.
जलचक्रीच्या वाटप कार्यक्रम करण्यासाठी याआधीच हडकाईचोंड येथे नारायण गभाले यांनी भेट देऊन खरी वस्तुस्थितीची पाहणी केली होती. सर्व वस्तीला एकत्र करुन गावाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. गावाची पाहणी करुन गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले. ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये, गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी म्हणून वेल्स ऑन व्हील्स या संस्थेच्या माध्यमातून हडकाईचोंड वस्तीला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले. ड्रम वाटपावेळी सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मितहास्य होते, महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. यावेळी वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे नारायण गभाले, संकेत बिडगर, आदित्य राजपूत, कुणाल चव्हाण, मुंजा कारके, रणजित कारके तसेच गावातील चिमण पवार, मोहन भोये, शंकर चौधरी, अरविंद भोये, सुभाष भोये, जलपरिषदमित्र दिपक मेगा आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. गावातील सर्व महिला वर्गाने उत्तम नियोजन करत सहभाग घेतला, मोठ्या आनंदात हा कार्यक्रम पार पडला.



