उंबरदे येथे 185 रुग्णांची मोफत नेत्रचिकित्सा, 26 जणांना चष्मे वाटप
शुभम नेत्रसेवा ट्रस्ट संचालित तापिबा नेत्र चिकित्सालय सीतापूर व स्मिता बेन पारेख यांच्यातर्फे रविवारी (दि. 7) उंबरदे येथील जिल्हा परिषद शाळेत नेत्र तपासणी शिबिर झाले. यावेळी डॉ. रोहन चरीवाला, श्रीराम मोरे, विलास गायकवाड, भगवत दिवा, रेणुका पटेल, पलक पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात 185 रुग्णाची मोफत तपासणी मोफत करण्यात आली. यातील 45 जणांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासह 26 रुग्णांना चष्मे व 12 रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आले. शस्त्रक्रिया सीतापूर (गुजरात) येथे करण्यात येणार आहे.