आश्रमशाळा मोहपाडा शाळेच्या व्हॉलीबॉल खेळाच्या सहा संघाची विभाग स्तरावर निवड…*
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

*आश्रमशाळा मोहपाडा शाळेच्या व्हॉलीबॉल खेळाच्या सहा संघाची विभाग स्तरावर निवड…*
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत, “प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा, सन 2025-26” शासकीय आश्रमशाळा दहिंदुले, ता. सटाणा येथे दि.6 ते 8 डिसेंबर 2025 दरम्यान संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉल खेळात 14 वर्षे आतील मुले-मुली, 17 वर्षे आतील मुले-मुली व 19 वर्षे आतील मुले-मुली हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. व्हॉलीबॉल खेळ प्रकारात आश्रमशाळा मोहपाडाच्या च्या सर्व सहा संघाच्या विद्यार्थ्यांनी एकतर्फी विजय मिळवले. या सर्व सहा संघांची विभागस्तरासाठी निवड झाली आहे.विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा जळगाव येथे होणार असून आश्रमशाळा मोहपाडा येथील 70 विद्यार्थी विभाग स्तरासाठी खेळणार आहेत. सर्व खेळाडू व मार्गदर्शक यांचे अभिनंदन.
सदर विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी सो. तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी सो. अकुनूरी नरेश साहेब, जानकर साहेब, साबळे साहेब, निकम साहेब, चौधरी साहेब, पवार साहेब, पाटील साहेब यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. सदर खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा मार्गदर्शक श्री कैलास चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुभाष दळवी व संतोष गौळी व सर्व सेवक वर्ग यांचे सहकार्य लाभले.



