
*आदर्श समतेचे सहा खोखो संघ विभाग स्तरावर*
दिनांक 6 ते 8 डिसेंबर 2025 रोजी सटाणा तालुक्यातील दहिंदुले येथे कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांच्या प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. सांघिक क्रीडा स्पर्धेत खोखो खेळ प्रकारात आदर्श समता शिक्षण संस्थेच्या अनुदानित अलंगुण आश्रम शाळेच्या मुलांनी 14,17 आणि 19 वर्ष वयोगट स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर, 14 आणि 19 वर्ष वयोगट भेगू आश्रमशाळा मुलीं प्रथम आणि 17 वर्ष वयोगट खिर्डी आश्रम शाळेच्या मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला .
कळवण प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी माननीय अकनुरी नरेश साहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी व इतर पदाधिकारी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.
आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेतील सहाही खोखो संघांनी विजय संपादन केल्यानेसंस्थांपक अध्यक्ष कॉ जे पी गावित, संचालक मंडळ प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले…..



