त्र्यंबकेश्वर तालुक्यात बनावट मद्य रॅकेटचा पर्दाफाश
बनावट लेबल लावून हॉटेल-धाब्यांना मद्यपुरवठा; एकास अटक

त्र्यंबकेश्वर तालुक्यात बनावट मद्य रॅकेटचा पर्दाफाश
बनावट लेबल लावून हॉटेल-धाब्यांना मद्यपुरवठा; एकास अटक
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर सीमारेषेवरील काकडपाणी परिसरात राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाने धडक कारवाई करत घरातच बनावट देशी-विदेशी मद्य तयार करणाऱ्या दादा बुधर (वय २९) याला अटक केली. या कारवाईत २ लाख ४४ हजार ११९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांची बनावट लेबले लावून देशी-विदेशी मद्य तयार केले जात होते. हे मद्य चोरट्या पद्धतीने महामार्गालगतच्या धाबे, हॉटेल तसेच काही दारू विक्री दुकांनांना पार्सल स्वरूपात पुरवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. गोपनीय माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघडकीस आला.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त उषा बर्मा मेहदम (नाशिक विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक पी. एम. गौडा, राहुल मोडक यांच्यासह पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.बनावट मद्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याने अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.



