# 🔴 ब्रेकिंग न्यूज 🔴 **कोट्यवधींचा खर्च, तरीही नळाला पाणी नाही! – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

🔴 ब्रेकिंग न्यूज 🔴 **कोट्यवधींचा खर्च, तरीही नळाला पाणी नाही!

जलजीवन योजनेचा फज्जा; मळगाव खु. ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला**

🔴 ब्रेकिंग न्यूज 🔴

**कोट्यवधींचा खर्च, तरीही नळाला पाणी नाही!

जलजीवन योजनेचा फज्जा; मळगाव खु. ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला**

कळवण तालुक्यातील ग्रामपंचायत मळगाव खुर्द अंतर्गत येणाऱ्या मळगाव बुद्रुक, सिद्धार्थनगर व गायदरपाडा या भागात केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी जलजीवन योजना अनेक वर्षांपासून अपूर्ण असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे दाखवले जात असतानाही प्रत्यक्षात गावकऱ्यांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

घराघरात नळाद्वारे स्वच्छ पाणी देण्याचे उद्दिष्ट असलेल्या या योजनेचे काम अर्धवट अवस्थेत असून, अनेक ठिकाणी पाइपलाईन टाकूनही पाणी सोडले गेलेले नाही. परिणामी नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ग्रामपंचायत मळगाव खुर्दतर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील शेतकरी केवळ ५ ते ६ लाख रुपयांत आणि अवघ्या १० दिवसांत पाइपलाईनचे काम पूर्ण करू शकतात, मात्र शासनाच्या जलजीवन योजनेचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने
➡️ जलजीवन योजना तात्काळ पूर्ण करावी,
➡️ मळगाव खुर्द येथे नवीन विहीर मंजूर करावी,
➡️ अपूर्ण कामांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी,
अशा ठोस मागण्या गावचे सरपंच सुकदेव बागुल व मनोज बोरसे ,कैलास भोये, lभाऊ पाटील,मोहन भाऊ ,नाणेशोर, शीताभाई, कल्पना ताई, व इतर महिला, याच्या नेतृत्वाखाली आदोलन केले व मागण्या केल्या आहेत.

दरम्यान, लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देण्याची शक्यता असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!