१३ मार्च २०२३ मध्ये झालेल्या एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावास
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

१३ मार्च २०२३ मध्ये झालेल्या एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावास
सुरगाणा पोलीस ठाणे हद्दीतील बिवळ, पोस्ट माणी (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथे एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादातून महिलेची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील मा. जिल्हा न्यायाधीश जे. डी. वडणे (कोर्ट नं. ५) यांनी सुरगाणा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. १५/२०२३ (भादंवि कलम ३०२) या प्रकरणाचा निकाल दिला. या खटल्यात आरोपी रमेश परशराम गावंडे (वय २४, रा. बिवळ, पोस्ट माणी, ता. सुरगाणा, जि. नाशिक) याच्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यास भादंवि कलम ३०२ अंतर्गत आजन्म कारावास व १,००० रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
ही घटना १३ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बिवळ गावातील फिर्यादीच्या राहत्या घराच्या पडवीत घडली होती. आरोपीने फिर्यादीच्या सुनेवर एकतर्फी प्रेमातून वाद घालून तिच्या डोक्यात कु-हाडीने वार करून तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी करून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात सरकारी अभियोक्ता शैलेश सोनवणे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर तसेच सुरगाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तर पैरवी अधिकारी मपोहवा/१५६२ व्ही. एस. गांगुर्डे यांनी प्रभावी पैरवी केल्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला.



