
कळवण नांदुरी रस्त्यावर भीषण अपघात
दोन तरुण गंभीर जखमी
कळवण नांदुरी रस्त्यावर साकोरे पाड्याजवळ स्विप्ट गाडी व स्प्लेंडर मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यात मोटार सायकलवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून दोघांवर कळवण येथे प्राथमिक उपचार करून नाशिक येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,आज दिनांक २२ डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कळवण कडून नांदुरीकडे मोटार सायकल नंबर MH41-BB – 3145 वरून भावेश कोठावदे राहणार कळवण वय २० व तुषार तुळशीराम गांगुर्डे वय २८ राहणार पाळे बुद्रुक हे कामानिमित्त जात असतांना नांदुरी कडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विप्ट गाडी नंबर MH – 41 – AZ – 9993 या गाडीच्या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कळवण कडून नांदुरी कडे जाणाऱ्या मोटारसायकलला जबर धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर कळवण येथे प्राथमिक उपचार करून त्वरित नाशिक येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत कळवण पोलीस स्टेशन येथे अजून कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे समजले आहे.
कळवण नांदुरी रस्त्यावरील साकोरे पाडा वळणावर नेहमीच अपघात होत असून मागील तीन महिन्यांपूर्वी असाच भीषण अपघात घडला होता त्यातही एकाला आपला पाय गमवावा लागला होता. वेळोवेळी कळवण नांदुरी रस्त्यावर अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.



