आपला जिल्हा
पेठ तालुक्यातील घटना,आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू

आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू
पेठ तालुक्यातील वांगणी येथील आश्रम शाळेतील कु. पूजा रमेश वरठे (वय १७, रा. बोर्डिंगपाडा) हिचा अचानक जुलाबाच्या त्रासामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी प्रकृती बिघडल्याने तिला पेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दि. १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



