गरिबीवर मात करत पंढरीनाथ बनला राष्ट्रीय खेळाडू. *सुवर्णपदकाणे आत्मविश्वास बळावला*

*गरिबीवर मात करत पंढरीनाथ बनला राष्ट्रीय खेळाडू…….*
*सुवर्णपदकाणे आत्मविश्वास बळावला*
दृढ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर क्षितिजावर झेप घेतलेली अनेक उदाहरणे पहिली कि नेहमी प्रत्यय येतो, तो कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ या कवितेचा….!
ओळखले का सर मला…? या ओळीतील अर्थातून आजवर गुरुजणांनी अनेक गुणवान रत्न शोधून काढली आहेत, शाळेच्या पवित्र मंदिरात शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांबरोबर इतर काही विशेष सुप्तगून असलेले विध्यार्थी शोधले कि सापडतात. आणि असे विशेष गुणवान विध्यार्थीच जगाच्या पाठीवर नावलौकिक घडवितात.
सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात बाफळून नावाच्या छोट्याश्या खेडेगावात चौथीपर्यंत शिक्षण घेतलेले हिरामण चौधरी आणिदुसरी शिकलेल्या राधाबाई चौधरी या गरीब दांम्पत्यांच्या पोटी पंढरीनाथ नावाचा पुत्र जन्मला.. त्यावेळची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने, शिक्षण घेणे कठीण वाटत होते, पण शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी जवळच असलेल्या अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगुण तालुका सुरगाणा या निवासी आश्रमशाळेत पाठविले. पहिलीपासून सुरु झालेला हा प्रवास तब्बल बारा वर्षाचा बनला, पंढरीनाथ हा या आश्रमशाळेत शिक्षण घेत असतांना लहानपणापासूनच मैदानावर झेपाऊ लागला होता, पळू लागला, त्याची खोखो खेळाची ओढ बघून क्रीडा शिक्षकांनी त्याला खोखोचे बाळकडू दिले, बघता बघता चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटात तालुका जिल्हा विभाग आणि राज्य स्तरावर प्रभावी खेळ करत राहिला, पंढरीनाथ सातत्याने प्रत्येक स्पर्धेत अव्वल खेळाडू बनत गेला,
डिसेंबर 2025 ला मात्र त्याने शालेय क्रीडा स्पर्धेत *राष्ट्रीय खेळाडूचा मान मिळविला*. लगेचच डिसेंबर महिन्यात मध्यप्रदेशातील जबलपुर येथे एकोणीसवर्षे वयोगट राष्ट्रीय खोखो स्पर्धेत, महाराष्ट्र राज्य संघाच्या टीमचा सदस्य बनला. त्यात महाराष्ट्र राज्याचा संघ सुवर्णंपदक विजेताही ठरला. खेळातील आक्रमन आणि बचाव कौशल्यातून अखेर पंढरीनाथने सुवर्णपदकाला गवसनी घातली.
बाफळून सारख्या खेडेगावातील ह्या मुलाने गरिबीचा विचार केला नाही, गरिबीचे चटके खाल्ले पण गरिबीचा बाऊ केला नाही, आश्रम शाळेत आहे त्या पारिस्थितीत राहिला, मैदानाशी मैत्री केली, खेळाशी एकनिष्ठ राहिला, जिद्ध चिकाटी आणि क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले. सकाळ संध्याकाळ दोनदोन तास मैदानावर घाम गाळला. लढण्याचे पाठबळ मिळत गेले, व्यायाम, सराव, करता-करता खेळाचे सर्व डावपेचही आत्मसात केले.
*घरी चैनीची साधने, टी.व्ही., मोबाईल नसल्याने मी जास्त वेळ वसतिगृहात आणि शाळेत राहिलो. त्यामुळे मैदान हेच माझे सर्वस्व बनले. परिस्थितीला दोष देत बसलो नाही. म्हणूनच मी राष्ट्रीय खेळाडू झालो, महाराष्ट्र राज्याच्या संघात खेळलो, आमचा संघ विजेता ठरला, आम्हीं सुवर्णपदक विजेते बनलो. कठोर परिश्रम, मेहनत, जिद्ध आणि क्रीडाशिक्षकांचे बाळकडू हे माझ्या यशाचे खरे रहस्य असल्याचे तो सांगतो.



