अलंगुण आश्रमशाळेत जिजाऊमाता जयंती आणि राष्ट्रीय युवादिन उत्साहात साजरा…..*

*अलंगुण आश्रमशाळेत जिजाऊमाता जयंती आणि राष्ट्रीय युवादिन उत्साहात साजरा…..*
दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगून ता सुरगाणा येथे राजमाता जिजाऊ आणि थोर तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे प्राचार्य श्री कैलास वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांनसमवेत प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी कुमारी लता गांगोडा, वैशाली पवार, ज्योती चौधरी आयेशा देशमुख, पूजा देशमुख यांनी राजमाता जिजाऊ यांचे मातृत्व, नैतिक मूल्य, संस्कार, आणि राष्ट्र प्रथम या शिकवनिविषयी मनोगत व्यक्त केले, देशातील युवकांना आत्मविश्वास, शिस्त आणि देशसेवेचे व्रत स्वीकारण्यासाठी स्वामी स्वामी विवेकानंदांनी युवकांना प्रेरणा दिल्याचे मनोगतात मांडण्यात आले.
प्राचार्य श्री कैलास वाकचौरे, प्राध्यापक श्री रामचंद्र गांगुर्डे, यांनी विध्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ मातेचे कार्य सांगतांना सांगितले कीं शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच संघर्षाचे धडे दिले, लढाऊवृत्ती, स्वातंत्र्य व स्वधर्माचे प्रेम असे संस्कार रुजविल्याने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. राज्यातील गोर गरीब शेतकरी कष्टकरी बांधवांना आणि माता बहिणींना न्याय दिला, संरक्षण दिले त्यामुळे त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे. थोर तत्वज्ञानी स्वामी विवेकानंदांनी युवकांना देशसेवेच्या कार्यात पुढाकार घेऊन देशाची प्रगती आणि विकास सध्यकरण्यासाठी पुढाकार घेण्याची शिकवण दिले त्याचे पालन येणाऱ्या तरुण पिढीने आत्मसात करावे असे सांगितले. प्राध्यापीका श्रीमती पूनम देवरे यांनी प्रास्ताविक केले, यावेळी आश्रमशाळेचे विध्यार्थी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. श्री ज्ञानेश्वर देवरे यांनी आभारप्रदर्श केले. आणि वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली..



