आहेरडी (गुजरात) येथे भीषण अपघात; दुचाकीवरील महिला ठार

आहेरडी (गुजरात) येथे भीषण अपघात; दुचाकीवरील महिला ठार
सापुतारा–वघईला जोडणाऱ्या आंतरराज्य महामार्गावरील आहेरडी–कुमारबंध फाटकाजवळ कार व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या ३९ वर्षीय महिलेचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.
खानपूर, ता. वांसदा, जि. नवसारी येथील शैलेश रामाभाई देशमुख हे त्यांच्या ह्युंदाई वर्ना कारने (क्रमांक GJ-21 AQ-8985) बेदरकार व निष्काळजीपणे रॉंग साईडने वाहन चालवत होते. यावेळी त्यांनी समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक GJ-30 C-4861) जोरदार धडक दिली. या दुचाकीवर दांपत्य प्रवास करत होते.
या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या सुनीता भोये यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच अंत झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.



