आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण
सुरगाणा नगर पंचायतमध्ये प्रथमच शववाहिनी गाडी – नगराध्यक्ष भरत वाघमारे यांचे उल्लेखनीय योगदान!
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

आदिवासी भागातील सर्वसामान्य जनतेच्या अडचणी ओळखून सुरगाणा नगर पंचायतचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष भरत वाघमारे यांनी सातत्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी पाठपुरावा करून सुरगाणा शहरात प्रथमच शववाहिनी गाडी उपलब्ध करून दिली आहे.
याआधीही नगराध्यक्ष वाघमारे यांनी नगर पंचायतीसाठी अनेक लोकहितार्थ सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये –
- अग्निशमन गाडी
- मोटरसायकल अग्निशमन (मोबाईल सेवा)
- माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अॅम्बुलन्स सेवा
- जिल्हा परिषद शाळा क्र. १ व २ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे
अशा उपक्रमांचा समावेश आहे.



