मनखेड आश्रम शाळेत भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
सुरगाणा तालुक्यातील मनखेड आश्रम शाळेत १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आणि स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा यांच्या कार्याचा स्मरण करून बा-हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप गिते यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाऱ्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते होते. यावेळी एन. डी. गावीत, माजी जि.प. सदस्य गोपाळ धुम, सरपंच सुनिल भोये, राजेंद्र निकुळे, नर्मदा भोये, कार्यक्रमाचे आयोजक उपसरपंच जयराम भोये, पोलीस पाटील सुरेश कामडी, रघुनाथ महाले, सदुबाबा गायकवाड, दिगंबर ब्राम्हणे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करत आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. शाळेच्या परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात जयंती कार्यक्रम पार पडला.