कनाशी येथे अवैध डुकराचे मांस विक्री; गावकऱ्यांचा संताप उसळला
कळवण तालुक्यातील कनाशी गावात धार्मिक स्थळांच्या शेजारीच अवैध डुकराचे मांस विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे गावातील सामाजिक व धार्मिक वातावरण दूषित झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
गावातील देवी मंदिर, बौद्ध विहार व मुलांच्या वसतिगृहाशेजारीच काही व्यक्तींनी खुलेआम हा अवैध व्यवसाय सुरू ठेवला आहे.
“धार्मिक स्थळे आणि वसतिगृहाजवळ असा गलिच्छ व्यवसाय सुरू ठेवणे हे आमच्यासाठी अपमानास्पद आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्यास आम्हाला आंदोलन करावे लागेल,” असा इशारा कनाशी परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण कळवण तालुक्यात चर्चेला उधाण आले असून नागरिक आता पोलीस प्रशासन संबंधितांवर कोणती कारवाई करते याकडे लक्ष ठेवून आहेत.