प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही नियतीसमोर आपण काही करू शकलो नाही, आणि आपला मित्र कै. दिगंबर चौधरी (फणसपाडा, ता.पेठ) आज आपल्या सर्वांमधून कायमचा निघून गेला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. तथापि, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक व मानसिक आधार देण्यासाठी विविध मित्रपरिवार, क्रिकेट संघ, खेळाडू, क्रिकेट प्रेमी तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.
या आवाहनाला पेठ, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक जिल्ह्यातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजाप्रती असलेली संवेदना आणि मैत्रीची भावना या माध्यमातून स्पष्टपणे जाणवली. या सहकार्यामुळे कै. दिगंबर चौधरी यांच्या कुटुंबास मोठा दिलासा मिळाला असून, ही कृती भविष्यात इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल.
आज दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना एक आधार म्हणून खालीलप्रमाणे मदत सुपूर्द करण्यात आली —
1️⃣ पेठ तालुका क्रिकेट कमिटी, पेठ तालुक्यातील सर्व क्रिकेट संघ, खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींकडून —
जमा रक्कम : ₹१,०६,०००/-
2️⃣ सुरगाणा तालुका क्रिकेट कमिटी, सुरगाणा तालुक्यातील सर्व क्रिकेट संघ, खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींकडून —
जमा रक्कम : ₹२०,०००/-
- 3️⃣ नाशिक जिल्हा आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांची रक्कम जमा करण्याचे काम सुरू असून ती लवकरच सुपूर्द होणार आहे.
सदर जमा झालेल्या रकमेतून —
मुलीच्या नावाने ₹६५,०००/- सुकन्या समृद्धी योजनेत ठेवण्यात येणार आहे.
मुलाच्या नावाने ₹५०,०००/- निश्चित ठेवीत (एफ.डी.) ठेवण्यात येणार आहे.
उर्वरित ₹११,०००/- रक्कम दुखवटा म्हणून पत्नीच्या हातात देण्यात आली.
सर्व मित्र परिवार, क्रिकेट प्रेमी, आप्तेष्ट आणि समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी दाखवलेली एकी व सामाजिक बांधिलकीची भावना हृदयस्पर्शी आहे. भविष्यातही सुख-दुःखात अशा प्रकारे “एक हात मदतीचा, एक हात आधाराचा” राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




