# सुरगाणा–धरमपूर–वलसाड एसटी बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

सुरगाणा–धरमपूर–वलसाड एसटी बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाणा–धरमपूर–वलसाड एसटी बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

 

स्थानीक विभाग नियंत्रक, मजूर वर्ग व व्यापारी वर्ग तसेच परिसरातील ग्रामस्थांनी सुरगाणा–धरमपूर–वलसाड या मार्गावर एसटी बससेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी करत विभागाला निवेदन सादर केले आहे.

सध्या नाशिक धोरणांतर्गत सुरगाणा–धरमपूर–वलसाड या मार्गावर एसटी बसचालना प्रस्तावित असली तरी वास्तविक सेवा सुरू झालेली नाही. दरम्यान, शेतकरी वर्ग,  शालेय विद्यार्थी, तसेच व्यापारी वर्गाला कामानिमित्त, शिक्षणासाठी व दैनंदिन गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर धरमपूर, बस्तार, वलसाड या ठिकाणी जावे लागते. परंतु एसटी सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना महागडी खाजगी वाहतूक वापरावी लागत असून आर्थिक भार वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर माळविभागातील नागरिकांनी विभाग नियंत्रकांना भेट देत निवेदनाद्वारे सदर बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली. मजूर वर्ग, विद्यार्थी, व्यापारी यांच्यासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची असून लवकरात लवकर एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!