आरोग्य व शिक्षण
उंबरपाडा दिगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ९५ रुग्णांची तपासणी

उंबरपाडा दिगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ९५ रुग्णांची तपासणी
स्वदेस फाउंडेशन व शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि. २६/१२/२०२५) रोजी उंबरपाडा दिगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम मंदिर परिसरात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात एकूण ९५ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
या शिबिरात डोळ्यांची तपासणी, अंगदुखी, सर्दी-खोकला, ताप व डोकेदुखी, गुडघे व कंबरदुखी यासह रक्त व बीपी तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक औषधे मोफत देण्यात आली. तसेच इतर आजारांबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना सहज व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आयोजकांकडून भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.



