हरसुलमध्ये बांगलादेशविरोधात जोरदार आंदोलन भारतीयांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ध्वजदहन

हरसुलमध्ये बांगलादेशविरोधात जोरदार आंदोलन
भारतीयांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ध्वजदहन
हरसुल येथील भगवान बिरसा मुंडा चौकात बुधवारी (दि. २४) हरसुल व परिसरातील तरुणांनी एकत्र येत बांगलादेशमध्ये भारतीयांवर होत असलेल्या अत्याचारांचा तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी आंदोलकांनी बांगलादेशचा ध्वज तसेच पंतप्रधान युनूस यांचा पुतळा जाळून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
या आंदोलनात हरसुल व परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग नोंदवला. आंदोलकांनी बांगलादेशविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बांगलादेशकडून भारतीयांवर होत असलेले कथित अत्याचार तात्काळ थांबवावेत, अन्यथा भारताने कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“भारत माता की जय”, “भारतीय सेना जिंदाबाद” अशा घोषणांद्वारे भारतीय जवानांचा गौरव करण्यात आला. आंदोलनावेळी सनी वाघचौरे, विजय लखन, अशोक भोये, बिट्ट चौधरी, विकी व्यवहारै यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.



