
आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून गणेश गावित यांचा गौरव
नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात सुरगाणा तालुक्यातील पोहाळी व बुबळी येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री. गणेश गावित यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
ग्रामपंचायत प्रशासनात पारदर्शकता, कार्यतत्परता, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामविकासातील योगदान आणि सक्रिय जनसहभाग या कार्याबद्दल गावित यांची निवड करण्यात आली. त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून सुरगाणा तालुक्यासाठी हा सन्मान अभिमानास्पद ठरला आहे.या गौरवामुळे पोहाळी व बुबळी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी गणेश गावित यांचे अभिनंदन केले आहे.



