दिंडोरी तालुक्यातील श्रीक्षेत्र रामशेज येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा १६ व १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात उपासक व साधक यांना दीक्षा प्रदान करण्यात येणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील भक्तगणांनी विविध माध्यमांतून सोहळ्याचा प्रचार-प्रसार सुरू केला असून, तीन महिन्यांनंतर जगद्गुरू श्रींचे नाशिकमध्ये आगमन होत असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सामाजिक कार्यासोबतच आध्यात्मिक ज्ञान देणारे नरेंद्राचार्यजींच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांत ओढ निर्माण झाली आहे. गावोगाव, वाडी-वस्त्यांवर या कार्यक्रमाची माहिती पोहोचवण्यात येत असून संस्थानतर्फे सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुरगाणा तालुका सेवा समिती यांच्या कडून करण्यात आले आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.