आपला जिल्हाक्राईम स्टोरी
अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई — मटका, आणि अवैध दारूविरोधात मोहिम सुरू
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई — मटका, आणि अवैध दारूविरोधात मोहिम सुरू
कळवण तालुक्यातील अभोणा, जयदर, ओतूर, गणोरे, कनाशी, नांदुरी आदी भागांमध्ये वाढत्या अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अभोणा येथील मटका पिढ्यांवर छापा टाकून चार आरोपींना ताब्यात घेतले. कल्याण आकड्याशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच अवैध दारू तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी तपास आणि गस्त वाढविण्यात आली आहे.¢
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले असून, कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
या कारवाईनंतर नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या जागृतीपर संदेशाचे कौतुक केले आहे.



