
वाहतूक कोंडीबाबत शनिवारी पेठ येथे रास्ता रोको
नाशिक – पेठ – धरमपूर या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतुक कोंडीने त्रस्त झालेल्या प्रवाशांच्या, वाहनधारकांच्या तीव्र प्रतिक्रियानंतर सर्वच तालुकास्तरावरील राजकीय पदाधिकारी, संघटना, सर्वपक्षीयच्या वतीने दि. 6 डिसेंबर रोजी रास्ता रोको करण्याबाबतचे निवेदन तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
या मार्गावरील सावळघाट व कोटंबीघाट येथील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. वाहने विशेषकरून माल वाहतुक करणारे मालवाहू ट्रक पलटी होण्याचे प्रमाण वाढल्याने तासनतास वाहतुक कोंडी होत आहे. या मार्गावरुन हजारो प्रवाशी प्रतिदीन प्रवास करीत असल्याने तसाच हा आंतरराज्य मार्ग असल्याने अबालवृद्ध, बालके यांचे प्रचंड हाल होत असतांना नियंत्रक यंत्रणा कुठेही सक्रीय नसल्याने शेवटी प्रवाशांनाच वाहतुकीतून सोडवणूक करण्याची नामुष्की येते. नाशिक – पेठ प्रवाशासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागत आहे. या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्षाच्या वतीने दि. 6 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्याम गावीत, संजय वाघ, पंकज पाटील, मोहन कामडी, राजेंद्र गायकवाड, रघुनाथ चौधरी, रमेश गालट, अशोक ताठे, हेमंत गायकवाड, याकुब शेख, नामदेव वाघेरे, प्रमोद शार्दुल, जीवन जाधव आदी उपस्थित होते.


